Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Sunday, October 9, 2016

Idioms
कोणतीही भाषा बोलत असताना केवळ व्याकरण व शब्दज्ञान पुरेसे नसते. ओघवती भाषाशैली निर्माण करण्यासाठी त्या भाषेतील म्हणी व वाक्प्रचार यांचा सहज वापर करता येणे अपेक्षित असते. इंग्रजी भाषेतील अशा काही idioms बद्दल या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. 
लोकप्रिय म्हणी व वाक्प्रचार येथे सोदाहरण स्पष्ट केले जाणार आहेत.
चला तर मग, सुरुवात करूया.

Actions speak louder than words.

'शब्दांपेक्षा कृती जास्त मोठ्याने बोलते' असा या म्हणीचा सरळ अर्थ आहे. एखादा माणूस केवळ मोठमोठ्या गोष्टी बोलत असेल, पण कृती मात्र काहीच करत नसेल, तर अशा माणसाला आपण हे खडे बोल सुनावू शकतो. मराठी भाषेत सुद्धा क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ही उक्ती प्रसिद्धच आहे. 
 'मी अमुक करेन, मी तमुक करेन' असे केवळ म्हणणा-यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. जो प्रत्यक्ष कृती करतो, तोच विश्वासास पात्र असतो. नाहीतर बोलाचीच कढी बोलाचाच भात, खाऊनिया तृप्त कोण झाला? अशी अवस्था येते. 

एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो -

कुसुमं वर्णसम्पन्नं गन्धहीनं न शोभते।
न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा।।

ज्याप्रमाणे सुंदर रंगांनी युक्त पण सुगंध नसलेले फूल शोभून दिसत नाही, त्याप्रमाणे क्रियेशिवाय केवळ गोड बोलणे शोभून दिसत नाही.