Between the Devil and the Deep Sea
शब्दशः अर्थ – सैतान व खोल समुद्र यांच्या मध्ये असणे
भावार्थ – अत्यंत अवघड अशा दोन पर्यायांपैकी एकाची
निवड करावी लागणे.
स्पष्टीकरण – कधी कधी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो.
आपल्यापुढे दोनच पर्याय असतात. कोणताही पर्याय निवडला तरी सारख्याच प्रमाणात
नुकसान ठरलेलं असतं. म्हणून कोणता पर्याय निवडावा, याचाच आपण विचार करत बसतो.
आपल्या एका बाजूला सैतान असेल व दुस-या बाजूला खोल समुद्र असेल तर कशाची निवड
करणार ? सैतानाकडे जाणार, की समुद्रात? दोन्ही पर्याय तेवढेच
वाईट आहेत.
मराठी म्हण – इकडे आड, तिकडे विहीर
एका
बाजूला आड आहे व दुस-या बाजूला विहीर आहे. कशातही उडी मारा, परिणाम सारखाच असेल.
संस्कृत म्हण – इतो कूपस्ततो तटी ।
मराठीसारख्याच
अर्थाची ही संस्कृत म्हण आहे. इतः - इकडे, कूपः – विहीर, ततः – तिकडे, तटी – नदी.
इकडे विहीर, तिकडे नदी.
Example –
Naresh has a
toothache. He just can’t bare it. At the same time, he doesn’t want to go to a
dentist, because he knows that he will have to take out his tooth and it is
going to hurt a lot. He is between the devil and the deep sea.