Sit on the Fence
शब्दशः अर्थ – कुंपणावर बसणे
भावार्थ – तटस्थ राहणे
स्पष्टीकरण – Fence म्हणजे कुंपण. कुंपण हे मालकीच्या
जागेच्या भोवती बांधले जाते. कुंपणावर बसणे म्हणजे एका अर्थी मालकीच्या जागेतही न
बसणे व बाहेरही न जाणे. म्हणजेच, कोणाचीही बाजू न घेणे.
‘तटस्थ
राहणे’ या शब्दप्रयोगात ‘तट’ शब्दाचा ‘किनारा’ असा अर्थ आहे. ‘स्थ’ म्हणजे ‘राहणे’.
संस्कृतमधील ‘स्था’ धातूपासून हे रूप बनलेले आहे. तटस्थ म्हणजे किना-यावर
थांबलेला. जो धड समुद्रातही नाही व जमिनीवरही नाही, तो तटस्थ. दोघांच्या भांडणात
जो कोणाचीही बाजू घेत नाही, तो तटस्थ!
Example –
Raj – Two of my friends are quarreling.
Ram – You should try to keep them from quarreling.
Raj – Actually both of them are wrong. I
just don’t understand what to do.
Ram – Then it’s better to sit on the fence.