Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Friday, October 21, 2016



Kill two birds with one stone

शब्दशः अर्थ – एका दगडाने दोन पक्षी मारणे

भावार्थ – एका प्रयत्नात दोन काम करणे

स्पष्टीकरण – एक दगड फेकल्यावर तो एका पक्ष्याला लागून तो पक्षी मरू शकेल. पण तोच दगड त्या पक्ष्याला लागून पुढे आणखी एका पक्ष्याला लागला तर? यालाच एका दगडात दोन पक्षी मारणे म्हणतात. व्यवहारात माणूस एकाच प्रयत्नात दोन कामे करू शकतो.


          श्यामरावांचे रामरावांशी कडाक्याचे भांडण झाले. एके काळचे घनिष्ठ मित्र आता एकमेकांना तोंड सुद्धा दाखवेनासे झाले. काही दिवसांनंतर ‘तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’ अशी स्थिती निर्माण झाली. पुढे रामरावांच्या घरी लग्नकार्य निघाले. त्यांना पैशांची गरज पडली. श्यामरावांची सावकारी होती. पण रामरावांना त्यांच्याकडे जाण्यास तोंड नव्हते. आता श्यामराव स्वतः रामरावांकडे गेले. रामरावांना हवी असलेली रक्कम त्यांनी व्याजाने दिली. एकीकडे मदत केली म्हणून शत्रुत्व संपले. जुने मित्र पुन्हा एक झाले. दुस-या बाजूने त्यांचा धंदा सुद्धा झाला. त्यांना दिलेल्या कर्जावर व्याज मिळेलच. मारले ना एका दगडात दोन पक्षी!

          याला हिंदीत काय म्हणतात बरं? सांप भी मर गया, और लाठी भी ना टूटी. है ना? चला आता मूळ विषयाकडे परत वळू. इंग्रजीत एक उदाहरण पाहू.
Jack: I have to go to Mumbai for my personal work. But my manager is not sanctioning the leave.
John: You can kill two birds with one stone.
Jack: How?    
John: We have a client in Mumbai. I am asked to go to Mumbai to deal with him. Tell you manager that you will go instead of me.
Jack: Wow! Thanks for the idea.    

Thursday, October 20, 2016


Once in a Blue Moon


अर्थ – कधीतरी, क्वचित्



स्पष्टीकरण – तसं पाहिलं तर या म्हणीचा काही संदर्भच लागत नाही. Blue moon म्हणजे निळा चंद्र. Once in a blue moon म्हणजे 'निळ्या चंद्रात एकदा'? काहीच अर्थ लागत नाही याचा! पण तुम्हाला माहित आहे का, की निळा चंद्र कशाला म्हणतात? English Calendar मध्ये कधी कधी एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात. एक पौर्णिमा महिन्याच्या सुरुवातीला व दुसरी शेवटी. एकाच महिन्यात आलेल्या या दुस-या पूर्ण चंद्राला ब्लू मून असे म्हणतात.



आता हा ब्लू मून केव्हा येतो माहित आहे? चक्क 32 महिन्यांनी! मग तुम्हीच सांगा, जर एखादी गोष्ट दर 32 महिन्यांनी घडत असेल तर  ती फार क्वचित घडते असंच म्हणणार ना आपण?



आपल्याकडे सुद्धा एखादा माणूस फार क्वचित भेटत असेल, तर आपण म्हणतो, 'तो कधीतरी अमावास्या-पौर्णिमेला भेटतो.'



Example-



Anup - What are your hobbies?

Kedar - I love travelling. I have been to almost all states in India.

Anup - That's great. Do also travel overseas?

Kedar - Yes, once in a blue moon.


Cry over spilt milk

शब्दशः अर्थ –  दूध सांडल्यावर रडणे

भावार्थ – होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल दुःख करीत बसणे.

स्पष्टीकरण – एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्याबद्दल दुःख व्यक्त करणे योग्य नाही. वाईट गोष्ट घडूच नये यासाठी प्रयत्न करावेत. त्यानंतरही जर एखादी वाईट घटना घडलीच, तर त्याबद्दल दुःख करीत बसण्याने काहीच उपयोग होणार नाही. दूध सांडू नये म्हणून काळजी घ्यावी. पण जर सांडलेच तर रडण्याने ते थोडेच परत मिळणार आहे? 

Example:


Seeta : Sukanya, I am feeling very sad because I lost hopes to get the money that I had lent to Radhika.

Sukanya      : I had warned you not to lend money to Radhika. She is a decietful girl.

Seeta : I had better listened to you.
 

Sukanya      : There is no use of crying over the spilt milk. 

मराठीतील म्हण – बैल गेला नि खोपा केला.


एका शेतक-याची बायको त्याला बैलासाठी खोपा (बैलांसाठी राहण्याचे गोठ्यासारखे ठिकाण) बांधण्याची दररोज आठवण करत असे. पण तो शेतकरी मात्र आळशीपणाने त्याकडे दुर्लक्ष करत असे. त्याची बायको त्याला म्हणायची की लवकर खोपा तयार करा नाहीतर एके दिवशी चोर येऊन बैल घेऊन जातील. एके दिवशी खरोखरीच चोरांनी बैल चोरला. त्यानंतर पश्चात्ताप झालेल्या शेतक-याने खोपा तयार केला! पण आता खोपा तयार करून काय उपयोग होता? बैल गेला तो गेलाच!


यासारख्याच अर्थाचे एक संस्कृत सुभाषित सुद्धा आहे.

निर्वाणदीपे किमु तैलदानं, चौरे गते वा किमु सावधानम्।
वयो गते का खलु मल्लविद्या पयो गते कः खलु  सेतुबन्धः।।

दिवा विझून गेल्यावर त्यात तेल टाकून काय उपयोग? चोर निघून गेल्यावर सावध होऊन काय उपयोग? वय निघून गेल्यावर मल्लविद्या (कुस्ती) शिकून काय उपयोग? पाणी निघून गेल्यावर पूल बांधून काय उपयोग?

Tuesday, October 18, 2016

Every cloud has a silver lining

AW© - à˶oH$ T>Jmbm EH$ énoar [H$Zma AgVo.

ñnï>rH$aU - EImXr 춺$s [H$Vrhr dmB©Q> Agbr Var Var {VÀ¶m~Ôb H$mhrVar Z¸$sM Mm§Jbo AgVo. Á¶mà‘mUo EImXm T>J nyU©nUo H$mimHw$Å> Agbm, VargwÕm ˶mÀ¶m H$S>m énoar a§JmÀ¶m [XgVmV. ‘amR>rV gwÕm hrM åhU ¶mM AWm©Zo dmnaVmV - à˶oH$ T>Jmbm EH$ énoar [H$Zma AgVo.

Example –

Chintu – My friend Dinkar is a very bad boy. He always tells lies and has many bad habits. He is the dullest student in our class. The only good thing to tell about him is his handwriting is very beautiful.  
Pintu – Indeed every cloud has a silver lining!

EImÚmMr gܶm dmB©Q> Agbobr n[apñWVr ~XbyZ nwÝhm Mm§Jbr n[apñWVr ¶oB©b, Aemhr AWm©Zo gXarb åhU dmnaVmV.