Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Monday, October 17, 2016



वाचकहो तुमच्यासाठी!
इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी व्याकरणाचे ज्ञान आवश्यक असते. अर्थात व्याकरण माहित नसलेले लोक सुद्धा भाषा बोलत असतात. पण अशा लोकांची बहुधा ती मातृभाषा असते. व्याकरणाच्या ज्ञानाने एक आत्मविश्वास नक्कीच निर्माण होतो.

दुसरी गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे शब्दसंपत्ती. व्याकरण चांगलं आहे पण पुरेशी शब्दसंपत्ती नाही, अशा अवस्थेत काय बोलणार? तेव्हा वेगवेगळ्या विषयांवरील पुरेसा शब्दसाठा आपल्याकडे नक्कीच हवा.

यापुढची पायरी असते ती म्हणी व वाक्प्रचार यांची. सदरील ब्लॉग हा त्यासाठीच निर्माण केलेला खजीना आहे. या अलीबाबाच्या गुहेत तुम्हाला इंग्रजी भाषेतील प्रचलित व लोकप्रिय म्हणी व वाक्प्रचार आढळतील. त्यांचे मराठीत मोकळ्याढाकळ्या भाषेत विवेचन आढळेल. स्पष्टीकरणे सापडतील. मराठी, हिंदी व संस्कृत इत्यादी भाषांमधील त्यासारख्याच म्हणी सुद्धा अधूनमधून डोकावतील.

यांचा उपयोग तुम्ही तुमच्या वाक्यात करा. तुमची भाषा समृद्ध करा. तुमच्या काही शंका असतील तर या पानाच्या तळाशी तुम्ही कॉमेंट करू शकताच. तुमचे स्वागत आहे.

तुमचा,

प्राणेश काशीकर

लातूर


No comments:

Post a Comment

तुम्ही तुमची प्रतिक्रिया / सूचना येथे लिहू शकता.