Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Monday, October 17, 2016

Don’t count your chickens before the eggs have hatched.
अर्थ – अंडी उबण्यापूर्वीच पिल्लं मोजू नका!

स्पष्टीकरण – एखादी गोष्ट अस्तित्वात येण्यापूर्वीच तिच्याबद्दल कल्पना करू नका, असे ही म्हण सांगते. काहीजण खूप स्वप्नाळू असतात. घर बांधायचं स्वप्न मनाशी ठेवून मनातच सातमजली इमारत, बागबगीचा, कारंजी तयार करतात. यालाच हिंदीमध्ये खयाली पुलाव पकाना असे म्हटले जाते.


एका माणसाने एकदा म्हैस विकत घेण्याचे ठरवले. मग त्याने स्वप्न बघायला सुरुवात केली. त्याने विचार केला की मी म्हैस विकत घेईन. मग ती दररोज वीस शेर दूध देईल. ते विकून मला खूप पैसे मिळतील. मग मी त्या पैशाने आणखी म्हशी विकत घेईन. टुमदार बंगला बांधेन. तेवढ्यात त्याच्या बायकोने त्याला स्वप्नातून जागे केले व म्हटले, म्हैस अजून बाजारात आहे. कोणीही जेव्हा अशा प्रकारे कल्पना करतो तेव्हा त्याला म्हैस अजून बाजारात आहे असेच म्हटले जाते. मनातले मांडे मनातच ही आणखी एक त्याच अर्थाची म्हण.

Don’t count your chickens before the eggs have hatched ही म्हण हाच विचार व्यक्त करते. आत्ता कोंबडीने अंडी घातली आहेत. ती उबवल्यानंतर त्यातून पिल्ले बाहेर पडतील. त्यामुळे इतक्यातच किती पिल्लं मिळतील, याचा हिशोब न घातलेलाच बरा. Don’t count the fish that is still swimming in the ocean ही आणखी एक याच आशयाची म्हण आहे.
Example:
Chetan            - I am planning to start a business.
Ketan  - That’s great! What kind of a business would it be?
Chetan            - I will sell books. This business will fetch lot of money. I will invest almost all the profit in the same business. By and by I will develop a big mall. Very soon I will be a multimillionaire!
Ketan  - Don’t count your chickens before the eggs have hatched.

No comments:

Post a Comment

तुम्ही तुमची प्रतिक्रिया / सूचना येथे लिहू शकता.