Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Sunday, January 29, 2017



Empty Vessels Make Much Noise

शब्दशः अर्थ – रिकामी भांडी खूप आवाज करतात.

भावार्थ – जे लोक अर्धवट ज्ञानी असतात, ते खूप बडबड करतात.

स्पष्टीकरण – पाण्याने भरलेले भांडे आवाज करत नाही. म्हणजे त्या भांड्यांचा आवाज होत नाही. पण रिकामी भांडी आवाज करतात, म्हणजेच रिकामी भांडी एकमेकांवर आदळल्यास त्यांचा आवाज होतो. त्याचप्रमाणे ज्ञानाने भरलेली माणसे शांत असतात. ती स्वतःबद्दल तावातावाने बोलत नाहीत. याउलट अर्धवट ज्ञान असलेली माणसे मात्र स्वतःबद्दल खूप काही सांगत बसतात. आपण स्वतः किती श्रेष्ठ आहोत, हेच समोरच्याला सांगत असतात. एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे –

सम्पूर्णकुम्भो न करोति शब्दम्
अर्धो घटो घोषमुपैति नूनम् ।
विद्वान् कुलीनो न करोति गर्वम्
जल्पन्ति मूढास्तु गुणैर्विहीनाः ।।

अर्थात्, पाण्याने संपूर्ण भरलेली घागर आवाज करत नाही. म्हणजेच, ती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेताना आतील पाण्याचा आवाज होत नाही. परंतु अर्धवट भरलेली घागर आवाज करते, म्हणजेच आतील पाणी डुचमळते. त्याचप्रमाणे चांगल्या कुळात जन्मलेला विद्वान् गर्व करत नाही. पण गुणहीन, मूर्ख लोक मात्र बडबड करतात.

उथळ पाण्याला खळखळाट फार ही याच अर्थाची मराठी म्हण.

Example:

Balu – Do you know Mr Sinha?
Kalu – The new resident in our society?
Balu – Yes. He always talks about himself. Whenever I see him, he begins telling something or other about himself only. He considers himself the greatest person on the planet.
Kalu – Is he really so great?
Balu – Not at all. Just look at his attitude.
Kalu – Empty vessels make much noise!

वाचकहो, सदरील म्हणींचा तुमच्या वाक्यांमध्ये उपयोग करून त्यांचा चांगला सराव करा. मग या म्हणी तुम्हाला योग्य वेळी आठवतील. तुमच्या शंका किंवा सूचना तुम्ही Comment Box मध्ये लिहू शकता. तुमच्या शंकांचे निरसन अवश्य केले जाईल.