Piece of Cake
मित्रांनो, आज आपण एक खूप
छोटा वाक्प्रचार अभ्यासणार आहोत. Piece of cake! शब्दशः अर्थ, केकचा तुकडा. केकचा तुकडा
खाणं म्हणजे किती सोपं काम, नाही का? फार चावावं लागत नाही. तुकडा तोंडात टाकला की
बस, विरघळून जातो. याचप्रमाणे एखादं काम फारच सोपं असेल, तर त्याला a piece of
cake असं म्हटलं जातं.
मराठीत यालाच डाव्या
हातचा मळ म्हणतात. जसं की ‘गणितं सोडवणं म्हणजे त्याच्या डाव्या हातचा मळ आहे.’
अर्थात् तो अत्यंत सहजपणे गणिते सोडवतो. असंच एक उदाहरण इंग्रजीत पाहूया.
Ganu : Hi Pappu! What
are you doing?
Pappu: I am trying to
solve these sums. It’s really a headache.
Ganu: Show me.
(After looking at the sums..)
Oh! It is a piece
of cake. Let me explain.