Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Sunday, January 22, 2017



Piece of Cake

मित्रांनो, आज आपण एक खूप छोटा वाक्प्रचार अभ्यासणार आहोत. Piece of cake! शब्दशः अर्थ, केकचा तुकडा. केकचा तुकडा खाणं म्हणजे किती सोपं काम, नाही का? फार चावावं लागत नाही. तुकडा तोंडात टाकला की बस, विरघळून जातो. याचप्रमाणे एखादं काम फारच सोपं असेल, तर त्याला a piece of cake असं म्हटलं जातं.
           
 मराठीत यालाच डाव्या हातचा मळ म्हणतात. जसं की ‘गणितं सोडवणं म्हणजे त्याच्या डाव्या हातचा मळ आहे.’ अर्थात् तो अत्यंत सहजपणे गणिते सोडवतो. असंच एक उदाहरण इंग्रजीत पाहूया.

Ganu : Hi Pappu! What are you doing?
Pappu: I am trying to solve these sums. It’s really a headache.
Ganu: Show me.
            (After looking at the sums..)
            Oh! It is a piece of cake. Let me explain.

No comments:

Post a Comment

तुम्ही तुमची प्रतिक्रिया / सूचना येथे लिहू शकता.