Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Sunday, February 5, 2017


In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

शब्दशः अर्थ आंधळ्या लोकांच्या देशात एक डोळा असलेला माणूस राजा बनतो.

भावार्थ विशेष क्षमता नसलेल्या लोकांमध्ये त्यांच्यापेक्षा थोडी अधिक क्षमता असलेला माणूस श्रेष्ठ ठरतो.

स्पष्टीकरण राजा हा सर्व दृष्टींनी श्रेष्ठ असणे अपेक्षित असते. त्याची शारीरिक उंची, सौंदर्य, शक्ती चांगली असावी लागते. पण जर एखाद्या देशात सर्वच लोक आंधळे असतील तर? त्या देशात एखाद्या माणसाला एका डोळ्याने दिसत असेल, तरीही तो राजा बनेल. एरवी सामान्यपणे एका डोळ्याने आंधळ्या माणसाला कोणी राजा केले नसते. पण त्या देशात एका डोळ्याने दिसेणेहीच एक महत्त्वाची बाब ठरेल.

ज्या ठिकाणी अतिसामान्य लोक राहतात, त्या ठिकाणी जगाच्या दृष्टीने सामान्य माणूस सुद्धा महत्त्वाचा गणला जातो.

मराठी म्हण वासरात लंगडी गाय शहाणी!
लंगड्या गाईला तसं महत्त्व कमीच. परंतु सर्व वासरे आहेत, व त्यांच्यात एकच गाय आहे पण ती लंगडी आहे. तर, लंगडी असून सुद्धा वासरांच्या दृष्टिकोणातून ती जास्त अनुभवी ठरते.

संस्कृत म्हण - निरस्तपादपे देशे एरण्डोSपि द्रुमायते। 

म्हणजेच, ज्या देशात झाडेच नाहीत, त्या देशात एरंडाला सुद्धा महत्त्व प्राप्त होते. एरंडाला तसं मह्त्त्व कमीच. म्हणूनच तर 'उंच वाढलं एरंड, परी न येई सुगंध' यासारख्या म्हणी जन्मल्या. अशा कमी लेखलेल्या झाडाला सुद्धा ज्या देशात झाडेच नाहीत त्या देशात महत्त्व मिळते.  

Example:

Vedant: I interviewed so many candidates today. Unfortunately none of them fits in our requirements.

Chetan: What about Mr. Jagdeesh Chate?

Vedant: He is better than others. He has good educational qualifications, but he has got no experience.

Chetan: I think you should hire him. In the country of the blind, the one-eyed man is king.

वाचकहो, आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
आपला,
प्राणेश काशीकर