Pranesh Kashikar welcomes you!
खालील म्हणी वाचल्या का? कोणत्याही म्हणीवर click केल्यास त्याबद्दल वाचता येईल.

In The Country of the Blind, the One-Eyed Man Is King

Empty Vessels Make Much Noise

Piece of Cake

Sunday, October 16, 2016

Bite off more than you can chew
अर्थ - जेवढं तुम्ही चावू शकता, त्यापेक्षा जास्त चावण्याचा प्रयत्न करणे

स्पष्टीकरण - माणसाने आपल्या क्षमता ओळखून वागलं पाहिजे. स्वतःला कमी लेखू नये हे खरंच. पण स्वतःच्या मर्यादा व क्षमता न ओळखता काहीच्या काही करू नये, हेही तितकंच खरं. चहा विकणारा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, हे आपण पाहिलंय. पण याचा अर्थ असा नाही की आज चहा विकणा-या प्रत्येक मुलाने धंदा सोडून कुठल्यातरी पक्षाची कास धरावी. 
     अनेकदा हा वाक्प्रयोग बोलण्याबद्दल सुद्धा वापरतात. ज्या क्षेत्राबद्दल आपल्याला फारशी जाण नाही, किंवा आपला अधिकार नाही, त्याबद्दल खास करून त्या क्षेत्रातल्या लोकांना सल्ला न देणे उत्तम. जर कोणी असे करत असेल तर त्याला मराठीत काय म्हणतात? बरोबर! 'लहान तोंडी मोठा घास'! हाच तर या इंग्रजी शब्दप्रयोगाचा मराठी अर्थ आहे. 

Example - 

(Sonu and his school teacher engage in a conservation.)
Sonu - Sir, I want to tell you something.
Teacher - Yes, Sonu, tell me. 
Sonu - Sir, now-a-days some teachers from our school are not coming to school on time. I know that I am biting off more than I can chew, but it will surely give negative message.
Teacher - You are right, Sonu. I will take care of it.   

वाचकहो, 
वाक्प्रचारांचा उदाहरणांच्या साहाय्याने अभ्यास केला की वाक्प्रचार समजणे सोपे जाते. अधिक प्रावीण्य मिळविण्यासाठी आपण स्वतःच्या वाक्यांमध्ये यांचा उपयोग करून पहावा.

आपला स्नेहांकित,
प्राणेश काशीकर 

4 comments:

  1. Sir,in last sentence it was written that i will take are of it. What is the meaning of the sentence?

    ReplyDelete
  2. Sir, in the last sentence it was written that i will take are of it. What is the meaning of the sentence?

    ReplyDelete
  3. Sanjayji,

    Thanks for taking out time to read the blog and comment.

    Please read it as 'I will take care of it.'

    Thanks,
    Pranesh Kashikar

    ReplyDelete
  4. Sanjayji,

    Thanks for taking out time to read the blog and comment.

    Please read it as 'I will take care of it.'

    Thanks,
    Pranesh Kashikar

    ReplyDelete

तुम्ही तुमची प्रतिक्रिया / सूचना येथे लिहू शकता.